गिरीश महाजनांनी राऊत आणि भुजबळांचे ते आरोप फेटाळले

गिरीश महाजनांनी राऊत आणि भुजबळांचे ते आरोप फेटाळले

नाशिक : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक महानगरपालिकेत भाजप सत्ताकाळात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पालिका प्रशासनाची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी ‘मी राऊतांचे आरोप नाकारत नाही’ असे वक्तव्य करून राऊतांच्या आरोपाला सहमती दर्शवली होती.

आज भारतीय जनता पक्षाच्या वसंतस्मृती या कार्यालयात झालेल्या पत्रकार बोलताना भाजप नेते तथा नाशिक प्रभारी गिरीश महाजन यांनी या सर्व आरोपाचे खंडन करतांना भाजप सत्ताकाळात झालेल्या विकास कामांची यादी प्रसिद्ध करतानाच भाजपचे महत्वाकांक्षी प्रकल्प बासनात गुंडाळले जात असल्यावरून त्यांनी संताप व्यक्त करताना, याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्याविरोधात आवाज उठवण्याची भावना व्यक्त केली.

First Published on: April 27, 2022 5:08 PM
Exit mobile version