आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र कुलपती अमित देशमुख, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ,कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.उपस्थित होते.

विद्यापीठात २५० कि.वॅ. क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑपेक्स तत्वावर सुरू करण्यात आलेल्या सौरउर्जा प्रकल्पाव्दारे विद्यापीठाला वीज उपलब्ध होणार आहे. या प्रशासकिय इमारतीचे व सौरउर्जा प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. दरम्यान सकाळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कुल येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी राज्यपालांचे पुष्प देऊन स्वागत केले. या स्वागताप्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु दिलीप म्हैसेकर,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी संदीप आहेर उपस्थित होते.

First Published on: November 3, 2020 10:51 AM
Exit mobile version