कळसुबाई शिखरावर गिर्यारोहकांनी उभारली गुढी

कळसुबाई शिखरावर गिर्यारोहकांनी उभारली गुढी

इगतपुरी । कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहकांनी २७ वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत कळसुबाई शिखरावर गुढी उभारली. उगवत्या सूर्याच्या किरणांमध्ये कळसुबाई मातेचा दूग्धाभिषेक करून पूजाअर्चना केली.

नववर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे, आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना आई कळसुबाई मातेचरणी करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च शिखरावर कळसुबाई मातेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या व जय श्रीरामांच्या जयघोषात गुढी उभारण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच, मतदान जनजागृतीच्या उद्देशाने विविध घोषणा देऊन गिर्यारोहकांनी शिखर दणाणून टाकले. तसेच, मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखरावरून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक सलोखा जपला.

उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, काळू भोर, निलेश पवार, विकास जाधव, बाळासाहेब आरोटे, नितीन भागवत, अशोक हेमके, सुधाकर तांबे, संजय शेवाळे, सुरेश चव्हाण, नामदेव जोशी, शरद महाले, भागीरथ म्हसणे, सोमनाथ भगत, रमेश हेमके, उमेश दिवाकर आदी सहभागी झाले होते.

First Published on: April 9, 2024 10:44 PM
Exit mobile version