फिरस्तीवर असलेल्या मेंढपाळ कुटुंबाने बैलगाडीवर उभारली गुढी

फिरस्तीवर असलेल्या मेंढपाळ कुटुंबाने बैलगाडीवर उभारली गुढी

आकाशाचं छत, मातीचं अंगण
कोसो दूर घर आणि आनंदाची पखरण… उराशी माया, हाताचा गोडवा
आणि समाधानाने भरलेलं मन…
अशी अनुभूती मेंढपाळ कुटुंबाने साजर्‍या केलेल्या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने आली. सतत भटकंती करत असलेल्या मेंढपाळ कुटुंबाने शेतात मुक्कामी असताना बैलगाडीवर गुढी उभारत मराठी नववर्षाचे स्वागत केले. विशेष म्हणजे घरापासून कोसो दूर असतानाही या कुटुंबाचा आनंद तसूभरही कमी झालेला नव्हता. हाताशी सारंकाही असतानाही नसलेल्या गोष्टींची खंत बाळगणार्‍या कुटुंबांसाठी फिरस्तीवर असलेल्या या कुटुंबाने जगण्याचा मूलमंत्रच दिला. या कुटुंबातील महिलेने चुलीवर गोडधोडाचं जेवण बनवलं होतं.

अभूतपूर्व पाणीटंचाई, दुष्काळाचे चटके आणि कोलमडलेले आर्थिक गणित यामुळे ग्रामीण भागात बहुतांश कुुटुंबांनी गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा केला. सर्वदूर दुष्काळाचे सावट, ओस पडलेली शेतं, पाण्यासाठी चाललेली भटकंती यामुळे यंदाचा हा सण बळीराजासाठी निराशादायक ठरला.

First Published on: April 9, 2024 11:58 PM
Exit mobile version