सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

नाशिक : कालबध्द पदोन्नती अंतर्गत पदोन्नती मिळावी. आश्वाशित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा दुसरा लाभ मिळावा आदी मागण्यांसाठी बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी त्र्यंबकरोडवरील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

राज्यभरात बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. स्थापत्य आभियांत्रिकी सहाय्यक या सार्वजनिक बांधकाम मधील पदावरून निवृत्त झालेले हे कर्मचारी आहेत. या पदाची निर्मिती १ जानेवारी १९९० मध्ये झाल्यानंतर या पदावर समावेशित झालेल्या कर्मचार्‍यांना शासनाने २००४ पासून समावेशन करून वेतन श्रेणीत घेतले आहे. मात्र ही पदनिर्मिती ज्या तारखेपासून झाली आहे, म्हणजे १ जानेवारी १९९० याच तारखेपासून आम्हाला समावेशन करून तेथून मिळणारे लाभ मिळावे, जेणेकरून सध्या मिळणार्‍या पेन्शनमध्ये वाढ होईल. सध्या मिळणारे पेन्शन हे अत्यंत कमी असून तो आमच्यावर अन्याय आहे अशी मागणी कर्मचारयांनी केली आहे. हे कर्मचारी निवृत्त होऊन दहा ते बारा वर्ष झाले आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने याचाच निषेध करत हे आंदोलन करण्यात आले.

First Published on: February 24, 2023 4:44 PM
Exit mobile version