नाशिकला पुन्हा यलो अलर्ट ; रविवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

नाशिकला पुन्हा यलो अलर्ट ; रविवारपासून मुसळधार पावसाचा अंदाज

Weather Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबईत बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

सप्टेंबरच्या प्रारंभीच राज्यभरात दमदार बरसलेल्या पावसाने नाशिकमध्येही चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने नाशिक शहरासह जिल्ह्यात उघडीप दिलीय. दरम्यान आता हवामान विभागाने पुन्हा एकदा नाशिकसह नंदुरबार, धुळे आणि जळगाव या चार जिल्ह्यांना रविवारपासून मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिलाय. राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी उत्तर महाराष्ट्रासह भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली, तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.

 

First Published on: September 17, 2021 7:08 PM
Exit mobile version