नामको बँक चेअरमनपदी हेमंत धात्रक

नामको बँक चेअरमनपदी हेमंत धात्रक

उत्तर महाराष्ट्रात अग्रणी असलेल्या दि नाशिक मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी हेमंत हरीभाऊ धात्रक यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत संचालक वसंत गिते यांनी धात्रक यांचे नाव सूचवले व संचालक सोहनलाल भंडारी यांनी त्यास अनुमोदन दिले.

यावेळी बोलताना मावळते चेअरमन विजय साने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रशासकीय काळात बँकेचा एनपीए हा ३८ टक्के होता, मात्र सोहनलाल भंडारी व माझ्या काळात तो शून्य टक्के (निव्वळ एनपीए) झाला. आम्ही सर्व संचालक मंडळ व सेवकवृंद यांच्या सहकार्याने बँकेची भरीव प्रगती झाली. यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन हेमंत धात्रक यांनी चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारताना आभार मानले. याप्रसंगी व्हा. चेअरमन हरीष लोढा, जनसंपर्क संचालक रजनी जातेगांकर, प्रकाश दायमा, शिवदास डागा, सुभाष नहार, अशोक सोनजे, गौतम सुराणा, पुंजाभाऊ सांगळे, राजाभाऊ डोखळे, पंढरीनाथ थोरे आदींनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी चेअरमन हरीभाऊ धात्रक, तानाजी जायभावे, प्रभाकर धात्रक, संचालक अविनाश गोठी, कांतीलाल जैन, रंजन ठाकरे, गणेश गिते, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार, महेंद्र बुरड, संतोष धाडीवाल, शोभाताई छाजेड, प्रशांत दिवे, अरुणकुमार मुनोत, शेख गफार शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, प्रसाद सौंदाणे, कल्पेश पारख, क्रेडाई बिल्डर असोसिएशन व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार परिषद घेणार
संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी बँकेची एक परिषद लवकरच नामको बँकेच्या वतीने आयोजित करण्यात येईल व त्यात बँकेचे प्रश्न येणार्‍या अडी-अडचणी या विषयावर चर्चेसाठी बँकिंग क्षेत्रातील मान्यवर, सर्व पक्षांचे नेते सहकारतज्ञ यांना निमंत्रीत करून सहकारी बँकांविषयी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती नूतन चेअरमन धात्रक यांनी दिली.

First Published on: June 7, 2021 7:45 PM
Exit mobile version