गणेशोत्सव ‘असा’ साजरा केल्यास नाशिक ग्रामीण पोलीस देणार खास अवॉर्ड

गणेशोत्सव ‘असा’ साजरा केल्यास नाशिक ग्रामीण पोलीस देणार खास अवॉर्ड

नाशिक : पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर गणराया अवार्ड पारितोषिक योजना जाहीर केली आहे. पाचही प्रकारात सर्वोत्कृष्ट ठरणार्‍या एका गणेश मंडळास संबंधीत पोलीस ठाण्याच्या पातळीवरील गणराया अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.

नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत यंदा ३ हजार ४४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मौलिक कामगिरीच्या बळावर जिल्ह्याच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सकारात्मक भर घालणार्‍या गणेश मंडळांचा सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून, नाशिक ग्रामीण पोलीसांनी अशा उत्कृष्ट कार्य करणार्‍या गणेश मंडळांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्याचे नियोजन केले आहे. याकामी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळाचे परीक्षण करण्यासाठी एक परीक्षण समिती गठीत करण्यात येणार आहे. समिती पोलीस ठाणे हद्दीतील सर्व परवानाधारक सार्वजनिक गणेश मंडळांचे परीक्षण करणार आहे.

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन टाळून पोलिसांनी वेळोवेळी दिलेले निर्देश पाळावेत. गणेश मंडळांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाजाच्या सकारात्मक जडणघडणीस हातभार लावावा. उत्कृष्ट गणेश मंडळास सन्मानपत्र देवून सन्मानित केले जाईल. : शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सार्वजनिक गणेश मंडळ निवडीचे पाच निकष

First Published on: September 20, 2023 2:43 PM
Exit mobile version