इगतपुरी : गतिमंद शाळेतील १२० विद्यार्थिनींचे भवितव्य टांगणीला

इगतपुरी : गतिमंद शाळेतील १२० विद्यार्थिनींचे भवितव्य टांगणीला

इगतपुरी : शहरातील पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा मंडळ संचलित, अनुसूयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिराभारती कर्णबधिर निवासी विद्यालय आणि रुक्माबाई अपंग युवक स्वयं सहाय्यता केंद्रात गेल्या आठ दिवसांपूर्वी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी या शाळेत शिक्षण घेत असलेल्या पालकांचा मेळावा घेतला होता. या पालक मेळाव्यात या केंद्रात शिक्षण घेत असलेल्या अनेक गतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांनी हजेरी लावली.

यावेळी तहसीलदार कासुळे यांना अनेक गतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले की, ही शाळा सगळ्या विद्यार्थ्यांना छान प्रकारे सांभाळत आहे. आपल्या घरी एक दिव्यांग मुल सांभाळायला किती अडचणी येतात याची कल्पनासुध्दा करता येत नाही. एवढ्या मुलांना शाळा खरोखर चांगल्या पद्धतीने संभाळत असून आमची काही एक तक्रार नसल्याचे बोलून दाखवले. तर अनेक पालकांनी आमच्या दिव्यांग मुलाला या शाळेत टाकल्यापासून त्यात लक्षणिय सुधारणा झाल्याचे सांगितले आहे.

जून २०१७ मध्ये पुण्यात्मा प्रभाकर शर्मा सेवा संस्थेने दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू केले होते. या केंद्रासाठी शासनाकडून कोणते अनुदान अथवा आर्थिक मदत केली जात नसून सेवा संस्थेने आपल्या देणगीदारांमार्फत हे केंद्र सुरू केले. या शाळेत १२० दिव्यांग, गतिमंद, मूकबधीर, कर्णबधीर आदी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. दर पाच वर्षांनी या केंद्राला मुदतवाढ देण्याची तरतूद असल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने जून २०२२ मध्ये सदर संस्थेला प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती. मात्र समाज कल्याण विभागाने या पुनर्वसन केंद्राची मान्यता रद्द केल्याने या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाचा तसेच शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. ही संस्था नियमित सुरु राहावी या पालकांच्या मागणीनंतर सदर संस्थेने याबाबत केंद्रीय समाज कल्याण विभाग, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कहू, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग नाशिक व तहसीलदार इगतपुरी यांना निवेदन देऊन सदर संस्था नियमित सुरु राहावी या मागणीचे निवेदन दिले आहे.

First Published on: September 7, 2022 7:16 PM
Exit mobile version