एक्साईजच्या कारवाईत तब्बल ५४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

एक्साईजच्या कारवाईत तब्बल ५४ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील ५४०० लिटरचा मद्याचा साठा म्हणजेच तब्बल ५३ लाख, ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील कारभारी हॉटेलसमोर, दहावा मैल, ओझर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या वाहन तपासणीत एक पॅकबॉडी असलेला सहाचाकी ट्रक (क्र. एमएच ४३ वाय ९२५१) हा तब्बल ५ हजार ४०० लिटर परराज्यातील विदेशी मद्यसाठा अवैध घेऊन जाताना आढळला. बबलू हरभजन यादव (वय ३९, रा. मु. हज्जीकडी, पो. ईटईरामपूर, ता. उत्तरौल, जि. बलरामपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ५३ लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले, तसेच गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक अ. गो. सराफ, व्ही. एम. पाटील, गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाउसाहेब घुले, लोकेश गायकवाड, युवराज रतवेकर आदींनी ही कामगिरी केली. या कारवाईत कळवण विभाग निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक आर. एम. डमरे, भरारी पथकाचे निरीक्षक एम. एम. काळे यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास दुय्यम निरीक्षक ए. जी. सराफ करीत आहेत.

First Published on: June 28, 2022 2:42 PM
Exit mobile version