थंडीमुळे मृत्यूचे तांडव; २४ दिवसांत रस्त्यावरील २३ जणांचा बळी

थंडीमुळे मृत्यूचे तांडव; २४ दिवसांत रस्त्यावरील २३ जणांचा बळी

नाशिक : शहरात थंडीमुळे रेल्वे स्टेशन, रामकुंडसह पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील २३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये बेघर व अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

शहरात थंडीमुळे नाशिककर हैराण आहेत. थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांचा वापर वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव सुरू आहे. मात्र, वयोवृद्ध नागरिकांसह बेघरांना सर्वाधिक त्रास होत आहे. परिणामी, हृदयविकाराने मृत्यू होणार्‍यांची संख्या वाढत आहे. जानेवारी महिन्यात थंडीमुळे सुमारे ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये अनेक मृतदेह बेवारस आहेत. महापालिका व पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी आढळून बेवारस मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. मृतदेह आजही नातेवाईकांच्या प्रतिक्षेत आहेत.

First Published on: January 25, 2022 9:02 AM
Exit mobile version