स्मार्ट सिटी अ‍ॅक्शन मोडमध्ये, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामे मार्गी लागणार ?

स्मार्ट सिटी अ‍ॅक्शन मोडमध्ये, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामे मार्गी लागणार ?

नाशिक : आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नागरिकांना सण-उत्सव साजरे करताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यांनी सर्व संबंधितांना कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यात नाशिक स्मार्ट सिटीच्या अंतर्गत येणार्‍या क्षेत्रनिहाय विकास परिसरात सुरु असलेल्या कामांबाबत आदेश देण्यात आले.

मालवीय चौक ते काट्यामारुती चौक गणेशोत्सव कालावधीत काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुंदर नारायण मंदिर ते पंचवटी कारंजा दोन ठिकाणी असलेल्या अडचणी सोडवून गणेश मंडळांना कुठलीही अडचण येवू नये, याबाबत दक्षता घ्यावी. मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टॅण्ड जवळील सर्व कामे सोमवारी (दि. २९) पूर्वी पूर्ण करावी. रामवाडी मुख्य चौफुली (गोदापार्क समोर)- रामवाडी पुलाजवळ-रामवाडी मुख्य चौफुली येथे काम पूर्ण करून गणेशोत्सव काळात कामामुळे कुठलीही अडचण येणार नाही, याबाबत कार्यवाही करणे. लक्ष्मी नारायण मंदिर ते सरदार चौक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी काही अडचण येणार नाही याची दक्षता घेणे आणि आवश्यक त्या ठिकाणी उत्सव होईपावेतो काम बंद ठेवणे. गोरेराम लेन (कमल साडी ते दशभुजा सिद्धीविनायक मंदिर) रस्ता तात्पुरता रहदारीसाठी खुला करून त्या अनुषंगाने उपाययोजना करणे. गायधनी लेन ( रविवार कारंजा ते ओम श्री रेणुका माता प्रसन्न पर्यंत तात्पुरता स्वरूपात रहदारीसाठी उपलब्ध करून दिला आहे. गोरेराम लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर काम पूर्ण करावे, अशा सूचना सुमंत मोरे यांनी दिल्या.

भालेकर ग्राउंड येथील ठेवलेल्या पाईपसंदर्भात पाईप हे घसरणार नाहीत, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात येईल. या ठिकाणी धक्क्याने पाईप हलू नये म्हणून पूर्णवेळ सुरक्षारक्षक आवश्यकतेनुसार नेमण्यात येईल. तसेच संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी क्षेत्रभेटी देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले.

First Published on: August 27, 2022 12:04 PM
Exit mobile version