आयपीएल सट्टेबाजी; पंचवटीत तिघांना अटक

आयपीएल सट्टेबाजी; पंचवटीत तिघांना अटक

प्रातिनिधीक फोटो

मुंबई-आग्रा महामार्गावरील के. के. वाघ महाविद्यालयासमोरील सरस्वतीनगरमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकत अटक केली. त्यांच्याकडून ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.अहमदनगर जिल्ह्यातील खेडगावचा मुख्य सुत्रधार फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत.

श्रेयश सुधाकर ढोले (२१), केतन कैलास आहेर (२१, रा. दोघे लक्ष्मीछाया अपार्टमेंट, सरस्वतीनगर) व तेजस आण्णासाहेब गंगावणे (१९, रा. हरीदर्शन अपार्टमेंट, धात्रक फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमोल ठुबे (खेडगाव, जि. अहमदनगर) असे मुख्य सुत्रधाराचे नाव आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.९) रात्री १० वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तिघेजण टीव्हीवर क्रिकेट सामना बघत सट्टा खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तिघेजण तीन मोबाईलच्या माध्यमातून एका वहीमध्ये क्रिकेटच्या नोंदी करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडील २ हजार २०० रूपयांची रोकड, टिव्ही, मोबाईल, सेटटॉप बॉक्स असा सुमारे ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर आडगांव पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मुख्य सुत्रधार अमोल ठुबे असून त्याच्या मागावर पोलीसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास सहायक निरिक्षक वाय. सी. पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरजकुमार बिजली, सहायक निरीक्षक वाय. सी. पाटील, गुन्हे शोध पथकातील कर्मचारी मुनिर काझी, विजय सूर्यवंशी, विनोद लखन यांनी केली.

First Published on: April 10, 2019 5:44 PM
Exit mobile version