रागाने पाहिले म्हणून ग्रामसभेत दोन गटात तुफान हाणामारी

रागाने पाहिले म्हणून ग्रामसभेत दोन गटात तुफान हाणामारी

जळगावमध्ये दोन गटामध्ये झालेल्या तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. शुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली आहे. साकळी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे दरम्यान एका नागरिकांने दुसऱ्याकडे पाहिले त्यावेळी त्यांना माझ्याकडे रागाने का पाहतो अशी विचारणा केली. यावेळी दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करत काठ्या आणि लाठ्याने मारहाण केली आहे. या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केले.

अशी घडली घटना 

प्रजासत्तातक दिनानिमित्त जळगावच्या साकळी येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली आहे. ग्रामसेवक भाषण करत असताना ही घटना घडली. शुल्लक कारण होते एकाने दुसऱ्याकडे पाहिले यावरुन हा वाद झाला आहे. वाद ऐवढा विकोपाला गेला की, दोन गटात लाठ्या-काठ्याने हाणामारी झाली. तर काही जणांनी दगडफेक देखील केली. या घटनेवेळी सभागृहाबाहेर उभ्या असलेल्या गाड्याची तोडफोड आणि कारच्या काचा फोडण्यात आल्या. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे साकळी गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या गावामध्ये पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

First Published on: January 26, 2019 3:41 PM
Exit mobile version