‘एकच मिशन, जुनी पेन्शन’च्या घोषणांत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’च्या घोषणांत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला होता.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, महाविद्यालयांचे रखडलेले वीस टक्के अनुदान त्वरित द्या, माहिती तंत्रज्ञान विषय कायम करा या प्रमुख मागण्यांसह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या ३३ मागण्यांसाठी नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनी बुधवार ३० जानेवारी रोजी नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’, ’विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ करा’, ‘वीस टक्के अनुदान त्वरीत द्या’ अशा घोषणा देत शिक्षकांनी बिटको महाविद्यालयापासून पायी मोर्चा काढला. डोक्यावर टोपी आणि हातात फलक घेवून रस्त्यावर उतरलेल्या शिक्षकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपसंचालक कार्यालयासमोर येताच मोर्चाचे भव्य सभेत रुपांतर झाले. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा संजय शिंदे यांनी शिक्षकांच्या मागण्यांवर प्रकाशझोत टाकत सरकारला इशारा दिला. यावेळी संघटनेचे सचिव अनिल महाजन, के. एन. आहिरे, आर. एन. शिंदे, डी. एम. कदम, डी. जे. दरेकर, टी. एस. ढोली, ए. टी. पवार यांसह कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

First Published on: January 30, 2019 6:17 PM
Exit mobile version