अडचणीच्या काळातही कादवाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल : नरहरी झिरवळ

अडचणीच्या काळातही कादवाची प्रगतीच्या दिशेने वाटचाल : नरहरी झिरवळ

दिंडोरी : साखर उद्योग अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे व संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीने काम करत कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आदर्श निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्ष भाजीपाल्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी अडचणीत असताना ऊस हे शाश्वत पीक बनले आहे. मतदारसंघात पाण्याचे विविध साठे निर्माण केले असून विजेची उपलब्धता वाढविण्याचे काम सुरू आहे. तरी शेतकर्‍यांनी जास्तीतजास्त ऊस लागवड करावी असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे 46 वा गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल, मवीप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक सयाजी गायकवाड, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, चेअरमन श्रीराम शेटे, व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते व संचालक मंडळ आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगाम शुभारंभ झाला त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते. प्रारंभी गव्हाण पूजन विलास कड, राजाराम भालेराव, भरत देशमुख, रामदास मातेरे, परिक्षीत देशमुख, नारायण पालखेडे यांचे हस्ते सपत्निक झाले.

झिरवाळ यांनी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेत बहुतांशी रस्त्यांची कामे मंजूर असून सर्व कामे सुरू होतील. जी कामे पावसाळ्यात खराब झाले ते पुन्हा करून घेतले जातील. सर्व कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या असून सर्वांनी चांगले काम करून घेण्यासाठी दक्ष राहावे असे आवाहनही केले.

यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविक करताना साखर उद्योग व कारखान्याची वाटचाल विषद केली. अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा ऊसतोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुमारे पाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी हंगाम यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. ऊसतोडीचे योग्य नियोजन करत प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊसतोड करण्यात येईल असे सांगितले. केंद्र सरकारने इथेनॉलला प्रोत्साहन दिले असून कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्या त्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्यात असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस हे शाश्वत पीक असून सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहनही श्रीराम शेटे यांनी केले.

यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल, मवीप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी सदाशिव शेळके, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, राजाराम बस्ते, दत्तात्रेय राऊत, अशोक वाघ, सुनील पाटील, रंजन पवार, राजू ढगे, उत्तम ठोंबरे, रंगनाथ बर्डे, अशोक कबाडे, विठ्ठलराव संधान, बाकेराव जाधव, शिवाजी जाधव, त्र्यंबक संधान, दत्तात्रेय जाधव, शंकरराव काठे, विठ्ठल संधान, भाऊसाहेब बोरस्ते, कैलास मवाळ, गुलाब जाधव, बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, सुरेश बोरस्ते, रामनाथ पाटील, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, शाम हिरे, बाजीराव बर्डे, चिंतामण पाटील, बाळासाहेब भालेराव, अशोक भालेराव, रामभाऊ ढगे, सुरेश कळमकर, संजय जाधव, दत्तात्रेय गटकळ, बाबुराव डोखळे, सुरेश कोंड, प्रकाश देशमुख, पंढरीनाथ संधान, बापूराव पाटील, तानाजी माळी, बबनराव देशमुख, छबू मटाले, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब सरोदे, गणपतराव सरोदे, पांडुरंग गडकरी, तुकाराम जोंधळे, शिवाजी दळवी, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, संचालक दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, शहाजी सोमवंशी, दिनकरराव जाधव, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ, अमोल भालेराव, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे, मधुकर गटकळ, सुनील केदार, राजेंद्र गांगुर्डे, रामदास पिंगळ, नामदेव घडवजे, जयराम उगले, अशोक वडजे, सोमनाथ मुळाने, साहेबराव कक्राळे, गंगाधर निखाडे, संतोष मातेरे आदींसह सर्व संचालक, अधिकारी, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने, संचालक शहाजी सोमवंशी यांनी तर संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

First Published on: November 2, 2022 11:41 AM
Exit mobile version