किसान रेलचा शेतकर्‍यांना मोठा आधार

किसान रेलचा शेतकर्‍यांना मोठा आधार

श्रीधर गायधनी, नाशिकरोड

मध्य रेल्वेने सुरु केलेल्या किसान रेलला चांगला प्रतिसाद लाभला असून दोन महिन्यांंत साडेबारा हजार टन मालाची वाहतूक करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

देशात सर्वप्रथम देवळाली कॅम्प ते मुझफ्फरपूर ही किसान रेल्वे दोन महिन्यांपूर्वी सुरु केली होती. यामुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला. या रेल्वेने ७ नोव्हेंबरपर्यंत बारा हजार चारशे टन मालाची वाहतूक केली. या व्यतिरिक्त ७५ हजार २८२ टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन वेळा शेतकर्‍यांच्या माल वाहतुकीसाठी किसान रेल उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. डाळींब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, भाजीपाला, बर्फातील मासे, नाशवंत वस्तूंची मालवाहतूक केली जात असल्याचे मध्य रेलेच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मध्य रेल्वेने सात महिन्यांत १३ हजार ४०० मालवाहतूक रेल्वे चालविल्या.

वॅगन्समधून अशी झाली वाहतूक

२.५० लाख – कोळसा
१.९५ लाख – कंटेनर्स
४२, ९५८ – सिमेंट
५,१२७ – अन्नधान्य
३०२२२ – खते
६०५४१ – पेट्रोल, तेल
१६९७३ – पोलाद
३३०३ – साखर
७८०५ – कांदा
२३२७ – कडबा
२८, ७२७ – इतर माल

First Published on: November 11, 2020 11:57 PM
Exit mobile version