तामसवाडीत बिबट्या जेरबंद

तामसवाडीत बिबट्या जेरबंद

निफाड तालुक्यामधील तामसवाडी गावातील मधुकर कचरु सांगळे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बुधवारी (दि.२९) पहाटे पाच वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याला सुरक्षितरित्या निफाड रोपवाटिकेमध्ये आणण्यात आले आहे.

येवला वनक्षेत्रामधील निफाड तालुक्यामधील तामसवाडी गावामध्ये ग्रामस्थांमध्ये मागणीवरुन २२ एप्रिल रोजी मधुकर सांगळे यांच्या शेतामध्ये बिबट्यासाठी पिंजरा लावला होता. बुधवारी (दि.२९) पिंजर्‍यामध्ये बिबट्या जेरबंद झाला. ही बाब शेतकर्‍यांना समजताच त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. ते बिबट्याला पिंजर्‍यासह निफाड रोपवाटिकेत घेवून आले. निफाडचे पशू वैद्यकीय अधिकार्‍यांनी बिबट्याची तपासणी करणार असून त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.याप्रसंगी येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, मनमाडचे वनपाल बी. जी. वाघ, विंचूरचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भैय्या शेख आदी उपस्थित होते.

First Published on: April 29, 2020 2:51 PM
Exit mobile version