पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात बिबट्याचे दर्शन

पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात बिबट्याचे दर्शन

नाशिक : पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात सोमवारी (दि. १२) सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील पर्यटकांसह सुरक्षा रक्षकांमध्ये भीती पसरली. यासंदर्भात, वन विभाग व पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी परिसरात धाव घेतली. याठिकाणी वन विभागाच्या पथकाने दीड ते दोन तास शोध घेतला, मात्र तो दिसला नाही. परंतु प्रत्यक्षदर्शीनी तो पांडवलेणीच्या खालच्या बाजूस दाट झाडांमध्ये पळाल्याचे सांगितले.

वन विभागाने त्या भागात पिंजरा ठेवण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गौळाणे शिवार व पाथर्डी गाव परिसरात व मळे भागातही बिबट्याचे दर्शन होत असल्याने या भागातील रहिवासी बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. कदाचित हाच बिबट्या पांडवलेणी भागात आल्याचा संशयही वन विभागाने वर्तवला आहे.

शहरलगत वारंवार दर्शन 

मागील काही महिन्यात शहराच्या लगतच्या दाट झाली, ऊसाची शेत आदि परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेकदा बिबट्याने मानव, पशुधन आदींवर हल्ला केल्याच्याही अनेक घटना घडत आहेत. यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी ज्यातून बिबट्या आणि मनुष्य वस्ती दोघांच्याही सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही. अशी मागणी आता पुढे येत आहे.

First Published on: September 14, 2022 1:08 PM
Exit mobile version