बीवायके कॉलेजात शिरला बिबट्या, महिलेवर हल्ला

बीवायके कॉलेजात शिरला बिबट्या, महिलेवर हल्ला

कॉलेजरोडवर बिबट्याचा संचार

शहरातील कॉलेजरोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी (दि.२९) सकाळी १० वाजेच्या सुमारास बिबट्या शिरल्याने परिसरातील नागरिकांना चांगलीच धडकी भरली. श्रद्धा पेट्रोल पंपाच्या रस्त्यावरुन येत असताना या बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला. मात्र, ही महिला थोडक्यात बचावली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे. बिबट्याचा शोध सुरू असून, हा बिबट्या येवलेकर मळ्याच्या बाजूने किंवा जॉगिंग ट्रॅककडून या भागात आला असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. दरम्यान, शहराच्या थेट मध्यवर्ती भागात बिबट्याचा संचार दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मात्र चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

First Published on: May 29, 2020 10:55 AM
Exit mobile version