नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन

नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन

नाशिक शहरासह जिल्हाभरात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, नाशिकमध्ये पुन्हा अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी (दि.८) जाहीर केला. सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

सोमवारी सायंकाळी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. नाशिकमधील परिस्थिती लक्षात घेता तातडीने पाऊल उचलणे गरजेचे होते. महिनाभरापासून सातत्याने आवाहन केले. मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाईवर आधारित व्यवस्थेऐवजी निर्बंध घालण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

..तर गंभीर कारवाई

जे व्यक्ती नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय एखादा व्यक्ती कोरोनाबाधित असेल आणि तो बाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल. कोरोनाबाधिताच्या कुटुंबाचीही तशी जबाबदारी असेल.

हे निर्बंध होणार लागू

– नाशिक, मालेगाव महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद
– यूपीएससी, एमपीएससी पूर्वघोषीत परीक्षा होतील.

– नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव सर्व शाळा बंद.

– जीवनावश्यक वस्तू (मेडिकल, वृत्तपत्र, दूध – वगळून) इतर दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहतील. त्यानंतर बाजारपेठा बंद होतील.

First Published on: March 8, 2021 9:08 PM
Exit mobile version