लॉकडाऊन इफेक्ट : पतीने केला मोबाईल ब्लॉक; पत्नीची आत्महत्या

लॉकडाऊन इफेक्ट : पतीने केला मोबाईल ब्लॉक; पत्नीची आत्महत्या

बीएससी परीक्षेसाठी माहेरी आलेल्या विवाहितेला लॉकडाऊनमुळे सासरी जाता आले नाही. मात्र, राग मनात ठेवून पतीने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करत दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितल्याने विवाहितेने आत्महत्या केल्यची घटना नालंदा बुद्ध विहारसमोर, श्रमिक नगर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी २५ डिसेंबर रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विवाहित महिला सासरी नांदत असताना घरगुती कारणावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. घर दुरुस्तीसाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. विवाहितेला बीएससीची परीक्षेसाठी माहेरी पाठवून दिले. मात्र, कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने आणि जिल्हा बंदीमुळे विवाहितेला सासरी येत आले नाही. विवाहिता सासरी न आल्याच्या कारणातून पतीने तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. लग्नातील साक्षीदारांना कॉल करुन दुसरे लग्न करणार आहे, असे सांगितले. ही बाब विवाहितेला समजली. त्यातून तिने १२ जानेवारी २०२१ रोजी ताणतणावात आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

First Published on: December 26, 2021 4:39 PM
Exit mobile version