महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ होणार ‘पेपरलेस’

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ होणार ‘पेपरलेस’

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

नाशिक : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील अव्वल विद्यापीठांमध्ये स्थान मिळवलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता ‘ई-ऑफिस’ संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पध्दतीनेच होणार असल्याने येत्या नवीन वर्षात विद्यापीठ ‘पेपरलेस’ करण्याचा संकल्प या विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरु लेफ्टनंट जनरल
डॉ. माधुरी कानिटकर यांनी केला आहे.

येत्या दोन वर्षात आरोग्य विज्ञान विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. विद्यापीठाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्यात आले आहेत. यात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा, अभ्यासक्रमातील बदल, डीजिटल टेक्नॉलॉजिचा अधिक वापर करण्यासोबतच विद्यापीठाला सर्वात प्रथम पेपरलेस करण्याचा संकल्प कुलगुरु डॉ.कानिटकर यांनी केला आहे. येत्या दोन महिन्यांत ही संकल्पना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यादृष्टिने विद्यापीठाने आवश्यक बाबींची पुर्तताही केली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रारंभीच विद्यापीठाचे कामकाज ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून सुरु होणार आहे.

आदिवासी भागात वैद्यकीय सेवा देशातील 80 टक्के जनता ग्रामीण भागात तर 20 टक्के नागरिक शहरात राहतात. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नसल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप सक्तीची केली आहे.

First Published on: November 11, 2021 9:10 AM
Exit mobile version