मालेगाव येथील सुताच्या फॅक्टरीला आग; २४ तासात आगीची दुसरी घटना

मालेगाव येथील सुताच्या फॅक्टरीला आग; २४ तासात आगीची दुसरी घटना

मालेगाव येथील सुतार फॅक्टरीला आग

मालेगाव शहरात टायर गोदामाला सोमवारी आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. मालेगावमधील चाळीसगाव फाटा येथील सायने बुद्रुक या ठिकाणी असलेल्या सुत फॅक्टरीला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. शिवारातील जाखोटिया यांची ही सुताची फॅक्टरी असल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

First Published on: April 16, 2019 4:18 PM
Exit mobile version