जीवनशैलीत सकारात्मक बदल करा; आरोग्याला प्राधान्यक्रम द्या!

जीवनशैलीत सकारात्मक बदल करा; आरोग्याला प्राधान्यक्रम द्या!

महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहराच्या विविध भागातील महिलांचा असा उदंड प्रतिसाद लाभला होता.

आपण खूप टेक्नोसॅव्ही झालो आहोत. नवे तंत्रज्ञान, नवी साधने याबाबत आपण जितकी उत्सुकता दाखवतो. तितकी आरोग्याबाबत दाखवत नाही. भारतात आरोग्याबाबतची जागरुकता अवघी १ टक्के आहे. चुकीच्या जीवनशैलीने अनेक आजारांना आपण जवळ केले आहे. रोजच्या धावपळीत आपण आरोग्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे, असा सूर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘आपलं महानगर’ आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित ‘आनंदी आणि सुदृढ जीवनशैली तसेच सर्व्हायकल कॅन्सर कसा टाळाल, या विषयावरील विशेष परिसंवादातून उमटला. एच.सी.जी. मानवता क्युरी कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राज नगरकर, प्रसिध्द कर्करोग तज्ज्ञ डॉ. रणजित जोशी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आपलं महानगरचे मुख्य संपादक संजय सावंत, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी स्वागत केले.

आरोग्याबाबतची उदासिनता चिंताजनक

डॉ. राज नगरकर म्हणाले, कॅन्सर विरुद्धची लढाई शारीरिक नसते तर मानसिक असते. प्राथमिक अवस्थेत निदान झाले तर जास्तीत जास्त ६ महिन्यात कॅन्सरच्या आजारातून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. ९ महिन्यांचं बाळंतपण सोसण्याची क्षमता आपल्यात मुलत:च असतांना ६ महिने स्वत:वर काम करणे आपल्याला अवघड नाही. आतापर्यंत मी ६५ हजार कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले. आपल्याकडे आरोग्य हे प्राधान्य फक्त १ टक्के लोकांचे असते. सर्वांना आपल्या गाडीची सर्व्हिसिंग लक्षात राहते. मात्र, शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. कॅन्सर तिसर्‍या टप्यात आढळण्याच्या ७० टक्के प्रकार भारतात आहेत. भारतात जगाच्या ३० टक्के कॅन्सर पेशंट आहेत. अजून १५ वर्षांनी हे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर जाईल. ९३ टक्के चीन ची लोकसंख्या वय ३५ च्या वरची आहेत. ७ टक्के भारतातील ७० टक्के लोकसंख्या तिशीच्या आतील आहे. भारतातील ७० टक्के लोकांची स्थिती आरोग्याच्या दृष्टीकोनातून अजून धोक्याच्या पातळीपर्यंत गेलेली नाही. ९५ टक्के कॅन्सर टाळता येऊ शकतात. कॅन्सर हा बहुतांशी आहार आणि जीवनशैलीशी संबंधित आहेत.

जीवनशैलीत आरोग्यदायी हवी

मनुष्य शरीरातील बदल सहजासहजी होत नाही. आपल्या स्वतःच्या शरीरावर हार्मोन्सचा प्रभाव जो २५ ते वर्ष तो ३५ वर्षे वाढला आहे. हा बदल समाज म्हणून पचवलाय. पालेभाज्या व दुधामध्ये लीड आणि आर्सेनिक या घातक घटकांचे प्रमाण वाढलेय. आपल्याकडील ७० टक्के दूध आहारासाठी योग्य नाही याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. शेतीतील रसायनांचा अतिरेक हे त्याचे प्रमुख कारण आहे. युवावर्गात कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. २० वर्षांपूर्वी आपण वंध्यत्वाबद्दल इतकं ऐकत नव्हतो. बाहेरून आपण सगळे सुंदर दिसतोय. आपले आंतरिक सौंदर्य चुकीच्या जीवनशैलीने लोपत चाललेय.

आहाराकडे लक्ष द्या

न्याहारी हा परिपूर्ण आहार आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ड जीवनसत्त्वाची कमतरता ही मोठी समस्या बनली आहे. आपल्याला सूर्य किरणे मिळत नाहीय. ही कमतरता हे ही एक कॅन्सरचे एक महत्वाचे कारण आहे. आता केमोथेरपी मुळे केस जाणार नाहीत. शारीरिक नाही तर मानसिक त्रास जाणार नाही. असे अत्याधुनिक मानवता क्युरी सेंटर मध्ये आम्ही आणले आहे.

‘जॉईन द चेंज’ चळवळ

नगरकर म्हणाले आम्ही ‘तंबाखूमुक्त नाशिक’ करण्याचे ध्येय समोर ठेवले असून त्याचाच भाग म्हणून ‘जॉईन द चेंज’ चळवळ सुरू केली आहे. त्यातून आतापर्यंत ७५ हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहोत.

डॉ. नगरकर यांनी दिलेल्या टिप्स..

First Published on: March 8, 2019 11:00 PM
Exit mobile version