तुंबलेल्या प्रस्तावांना आजच्या महासभेत वाट

तुंबलेल्या प्रस्तावांना आजच्या महासभेत वाट

निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ‘तुंबलेल्या’ धोरणात्मक निर्णयांच्या प्रस्तावांना अखेर मंगळवारी (ता. २५) होणार्‍या महासभेत वाट मोकळी होणार आहे.

या सभेत मिळकतींचे धोरण, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात नगररचना परियोजना अर्थात टीपी स्कीम राबवण्याची उद्घोषणा करणे, महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षयपात्र योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन व्यवस्था राबविणे, शहरातील मोबाईल टॉवर्सना परवानगी देणे, झोपडपट्टी निर्मूलन योजना तसेच गावठाण विकासासाठी आघात मूल्यमापन अहवाल तयार करणे आदी महत्वपूर्ण प्रस्ताव या महासभेवर चर्चेसाठी आहेत. पोटनिवडणुकीची आचारसंहिता सोमवारी (दि.२४) संपुष्टात आल्याने महापौर रंजना भानसी यांनी धोरणात्मक निर्णयास्तव प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर चर्चेसाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता महासभा बोलविली आहे. २९ मे रोजी तहकूब करण्यात आलेल्या महासभेच्या पटलावरील प्रलंबित विषयांवर आधी चर्चा होईल. त्यानंतर २० जून रोजीच्या तहकूब महासभेचे कामकाज होणार आहे.

First Published on: June 25, 2019 8:29 AM
Exit mobile version