लग्नसराई : दोन वर्षांनंतर लग्नसोहळ्यांना दणक्यात सुरुवात

लग्नसराई : दोन वर्षांनंतर लग्नसोहळ्यांना दणक्यात सुरुवात

दिलीप कोठावदे,  नवीन नाशिक

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी वाजत-गाजत लग्नसोहळ्यांना जल्लोषात सुरुवात झाली. २०२१ मध्ये २५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान लग्नाचे मुहूर्त असून या काळात अवघे १६ विवाह मुहूर्त आहेत. अशा परिस्थितीत मंगल कार्यालयांपासून, बँड, केटरर्स, फोटोग्राफर आणि गुरुजींकडेही जोरदार बूकिंग सुरू झाले आहे.

मंगल कार्यालये, ब्राह्मण, तसेच लग्नसोहळ्यासाठी अन्य सेवा-सुविधा पुरवणार्‍यांकडून या १६ दिवसांत मोठ्या संख्येने विवाह सोहळे संपन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ज्योतिष अभ्यासक अनिल चांदवडकर यांच्या मते, १५ नोव्हेंबरच्या देवोथ्थान एकादशी व तुलसी विवाह सोहळ्यानंतर लग्नसराईला प्रारंभ झाला. १९ नोव्हेंबरचा अमृत सिद्धी योग व ८ डिसेंबरला विवाहपंचमीच्या मुहूर्तावर सर्वाधिक विवाह मसोहळे संपन्न होतील. तुलसी विवाहानंतर खर्‍या अर्थाने विवाहाच्या धुमधडाक्याला आरंभ होत असल्याने मंगल कार्यालये, बँडवाले, आचारी, भडजी, केटरर्स, मंडप डेकोरेटर्स, कापड व्यापारी, छायाचित्रकार, किराणा व्यापारी, फूलवाले, पत्रिका छपाईवाले आदी सर्व लोकांचा फायदा होणार आहे. त्यादृष्टीने त्यांची तयारीही सुरू झाली आहे. मागच्या जवळपास दोन वर्षांच्या काळात कोरोनामुळे त्यांचे नुकसान झाले होते. आता नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांच्या काळात मलमास वगळता आठ महिन्यात तब्बल ७० पेक्षा जास्त विवाह मुहूर्त आहेत.

विवाह सोहळ्यांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त..

नोव्हेंबर २०२१ : १६, २०, २१, २२, २८, २९ व ३०

डिसेंबर २०२१ : १, २, ६, ७, ८, ९, ११, १३

जानेवारी २०२२ : २२, २३, २४, २५

फेब्रुवारी २०२२ : ५, ६, ७, ९, १०, ११, १२, १८, १९, २०, २२

मार्च २०२२ : या महिन्यात लग्नासाठी फक्त ४ व ९ हे दोनच शुभ मुहूर्त आहेत

एप्रिल २०२२ : १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ व २७

मे २०२२ : ४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७
जून २०२२ : १, ६, ८, ११, १३, १४, १५, १६ व १८
२२ जुलै २०२२ : ३, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.
First Published on: November 17, 2021 11:59 PM
Exit mobile version