शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव नाशिकला; जिल्हाधिकाऱ्यांसह हवाई दलाची मानवंदना

शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव नाशिकला; जिल्हाधिकाऱ्यांसह हवाई दलाची मानवंदना

शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव घरी दाखल

श्रीनगरमधील बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या निनाद अनिल मांडवगणे (३३) यांचे पार्थिव गुरुवारी, २८ फेब्रुवारीला रात्री उशिरा ओझर येथील विमानतळावर विशेष विमानाने आणण्यात आले. शुक्रवारी, १ मार्चला सकाळी ९ वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लखनौ येथे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसासाठी गेलेले त्यांचे सर्व कुटुंबीय गुरुवारी दुपारी नाशिकला परतले. शुक्रवारी सकाळी डीजीपीनगर-१ मधील त्यांच्या निवासस्थानी निनाद यांचे पार्थिव आणले जाणार आहे. त्यानंतर ९ वाजेदरम्यान पंचवटीतील अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निनाद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने अमरधाम परिसराची पाहणी केली.

First Published on: February 28, 2019 11:01 PM
Exit mobile version