रेल्वे थांब्यासाठी भरपावसात आंदोलन

रेल्वे थांब्यासाठी भरपावसात आंदोलन

नांदगाव : कोरोना काळापूर्वी येथील रेल्वे स्थानकात ज्या गाड्यांना थांबा मंजूर होता त्यापैकी अद्यापही पाच गाड्या पूर्ववत झाल्या नसल्याने या करिता रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधी चौकात ‘आम्ही नांदगावकर’ प्रश्न माझ्या गावाचे या समितीतर्फे घोषणाबाजी करीत भरपावसात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहरातील विविध स्तरावरील घटक सहभागी झाले होते. दोन दिवसापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महानगरी व काशी एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या थांब्याचा सोहळा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत पार पडला होता. रेल्वेने अन्य गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा याकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्यांच्या थांब्याकरिता आम्ही नांदगावकर, प्रश्न- माझ्या गावाचा यांच्या तर्फे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. नांदगाव रेल्वे थांबे, पादचारी पूल तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी यावेळी अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या. सर्व गाड्याचा थांबा नसल्याने रुग्ण, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहे. यासाठी कोविड-१९ काळापूर्वी थांबणार्‍या सर्व एक्सप्रेस गाड्यांना नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे, नांदगावकर अशी मागणी नांदगावकर करत आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त काशी, महानगरी एक्स्प्रेसला या दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. आता इतर गाड्यांसाठी मागणी जोर धरू लागली आहे. प्रवांशाची सोय होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे. नांदगावकरांची मागणी मान्य झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, प्रशासनाने मागणीची दखल घ्यावी असाही इशारा देण्यात आला आहे.

First Published on: August 19, 2022 1:08 PM
Exit mobile version