जिल्हा शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय उपकरणे चोरीला

जिल्हा शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय उपकरणे चोरीला

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात १० दिवसांपूर्वी तीन बोगस महिला डॉक्टर आढळून आल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजेदरम्यान रिक्षामध्ये दोन युवक वैद्यकीय उपकरणे नेण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी ट्रॉली घेऊन जात असल्याचे उघडकीस आले.

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रिक्षातून दोन अनोळखी युवक आले. ते मुख्य इमारतीमागे वैद्यकीय 1 साहित्य ठेवलेल्या ठिकाणी गेले. दोघांनी ते साहित्य रिक्षात ठेवले. त्यानंतर ते रिक्षातून जात असतान रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्यांना हटकले असता चोरी केल्याचे समोर आले.

रुग्णालयाकडून दोघांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. जिल्हा रुग्णालयात भरदिवसा व रात्री अनोळखी व्यक्ती बिनदिक्कत वावराना आढळून येतात. फेब्रुवारी २०२१ मध्ये एका युवकाने चिमुकलीचे अपहरण केले होते. विशेष म्हणजे, भुरट्या चोरट्यांचा त्रास रुग्ण व नातलगांना नेहमीच होत आहे. वाहनचोरीच्या घटनाही नित्याच्याच झाल्या आहेत. तरीदेखील रुग्णालयातील सुरक्षिततेबाबत योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

First Published on: April 16, 2022 2:23 PM
Exit mobile version