धम्म महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

धम्म महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

नाशिक : शहरात अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महाश्रामणेर शिबिरात बुधवारी (दि. 28) रोजी 1 हजार धम्म उपासक व श्रामणेर यांची नाशिक शहरातून रॅली तथा मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीव्दारे विश्वशांतीचा संदेश देण्यात आला. रॅलीचा समारोप म्हसरूळ येथे करण्यात आला.

सीबीएसजवळील ईदगाह मैदानापासून या मिरवणूकीला सुरूवात झाली. सीबीएसमार्गे म्हसरूळ येथील बौद्ध राजविहारात या रॅलीचा समारोप झाला. मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या. रॅलीत सर्वात पुढे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा रथावर ठेवण्यात आला होता. त्यामागोमाग छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा जिवंत देखावा होता. मिरवणुकीत भन्ते नागसेन, भन्ते धम्मरत्न, भन्ते बोधीपाल, भन्ते महामोगलान, भन्ते सारीपुत्र, भन्ते कौटीण्य आदी सहभागी झाले होते. याप्रसंगी भन्ते धम्मरत्न यांनी मार्गदर्शन केले. आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे अशोक गांगुर्डे, संदेश पगारे, सोमनाथ शार्दुल, संजय नेटावदे आदी सहभागी झाले होते.

First Published on: September 29, 2022 12:42 PM
Exit mobile version