पिंपळगाव बसवंतला २२ ला मोदींची सभा

पिंपळगाव बसवंतला २२ ला मोदींची सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पिंपळगाव बसवंत येथे येत्या २२ एप्रिलला निश्चित झाली आहे. या सभेला उत्तर महाराष्ट्रातील युतीचे सर्वच उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होती. त्यावेळी मोदी लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांवर युतीने एकहाती विजय संपादित केला होता; परंतु विधानसभा निवडणुकांवेळी दोन्ही पक्ष हे स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमधील भाजपाच्या उमेदवारांसाठी तपोवनातील मैदानावर सभा घेतली होती. त्या सभेनंतर भाजपाला चांगला फायदा झाल्याने पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यात मोदी यांना पाचारण करण्याची तयारी केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपचा उमेदवार दिंडोरी मतदार संघात आहे आणि नाशिक मतदारसंघाच्या जवळच पिंपळगाव बसवंत हे शहर असल्याने येथेच सभा घेण्याचे आता निश्चित झाले आहे. सभेची वेळ अद्याप निश्चित नाही. ही सभा उन्हात न घेता सायंकाळच्या वेळी घ्यावी, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.

नाशकात फडणवीस-ठाकरेंची सभा

एकीकडे पिंपळगाव बसवंत येथे नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याचे निश्चित असताना दुसरीकडे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन स्वतंत्र सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. येत्या २३ एप्रिलच्या पुढे या सभा होतील.

सर्वच पदाधिकारी प्रयत्नशील

पंतप्रधानांची सभा पिंपळगाव बसवंत येथे होणार आहे. त्यासाठी सर्वच पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
– आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप

First Published on: April 10, 2019 11:32 PM
Exit mobile version