नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचा विनयभंग

नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचा विनयभंग

विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असताना एक शिक्षक सतत तिचा पाठलाग करत अंगलट करण्याचा प्रयत्न करायचा. तिला नापास करण्याची धमकी देत त्याने तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (ता.१६) दुपारी २ वाजता भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज येथे घडली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने आडगांव पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश अंबेकर (३०, रा.ओझर, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये असताना शिक्षक अंबेकर बोलण्याच्या बहाण्याने सतत अंगलट करत असे. तो पीडितेचा पाठलाग करायचा. पीडितेला नापास करण्याची धमकी देवून, तु माझ्या बोलत का नाही, तु फक्त माझीच आहेस, असे म्हणत शिक्षकाने पीडितेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे करत आहेत.

First Published on: April 19, 2019 2:06 PM
Exit mobile version