मुथूट दरोडा : शस्त्रांसह चौघे संशयित ताब्यात

मुथूट दरोडा : शस्त्रांसह चौघे संशयित ताब्यात

मुथूट फायनान्सच्या याच कार्यालयात दरोडेखोरांनी हल्ला केला होता.

दरोडेखोरांच्या शोधार्थ राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शहर पोलिसांनी संशयित चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी सीबीएस परिसरातील हॉटेल पदमामध्ये केली. निखील उमाकांत तावरे (२२), शुभम संदीप उत्तेकर (१८), अक्षय गणेश लोले (वय २२), दत्ता नारायण गिरे (२५, सर्व राहणार पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

भरदिवसा मुथूट फायनान्स कार्यालयात चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. मात्र, सायरन वाजल्याने दरोडेखोर फरार झाले. त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी केली. दरम्यान, हॉटेल पद्मा येथे पुण्यातील चार जण असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी येत तपासणी केली असता, त्यांच्या बॅग्जमध्ये चॉपर व कुकरी सापडली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे, योगिता नारखेडे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड आदींनी केली.

First Published on: June 16, 2019 9:10 PM
Exit mobile version