३ सप्टेंबरला नाशिक शहरात दुधपुरवठा नाही

३ सप्टेंबरला नाशिक शहरात दुधपुरवठा नाही

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या बैठकीत दूध दरवाढीचा प्रस्ताव मांडत ३ सप्टेंबर रोजी दूध शहरात पोहोचवायचे नाही, असा ठराव संमत करण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यातील दूध विक्री व भाजीपाला विक्री करणार्‍या शेतकर्‍यांसह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वादळी बैठक पार पडली. शेतकरी दिवसरात्र शेतात काम करतो, ऊन वारा, पावसाची तमा न बाळगता शेतात पिकलेले धान्य, भाजीपाला, दूध शेतीसह उपजीविकेसाठी विविध कामे करतो. मात्र, आपल्या कोणत्याही मालाला भाव देणे त्याच्या हातात राहत नाही. व्यापारी, भरेकरी लूट करत असल्याने यामुळे आर्थिक तुटीची परिस्थिती निर्माण होऊन कौंटूबिक समस्या उभ्या राहत आहे. यातून बाहेर पडताना शेतकरी आत्महत्याचे पाऊल टाकले जाते. विविध प्रकारचे आंदोलने केली जातात; मात्र स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. आता शासनाने वेळेत लक्ष केंद्रीत न केल्यास सुरुवातीला दूध अन् नंतर मागील वर्षी प्रमाणे गावाकडून शहरात जाणारा फळं, भाजीपाला, यासारख्या जीवनावश्यक वस्तू पाठवणार नसल्याचा पवित्रा शेतकरी बांधवांनी बैठकीत घेतला आहे.

बैठकीत तालुक्यातील दौंडत, आडवन, कांचनगाव, पारदेवी, उभाडे, पिंपळगाव मोर, उंबरकोन, तळोशी, वाघेरे, वाकी, खंबाळे, घोटी, आहुर्ली, सांजेगाव, शेणवड, खैरगाव, तळोघ, काळूस्ते, कावनई, कोरपगाव, भावली, शेवगेडांग,पारदेवी भागातील शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: August 31, 2019 11:55 PM
Exit mobile version