नाशिकच्या पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना खडे बोल

नाशिकच्या पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना खडे बोल

नाशिक : नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्यामध्ये आरोपप्रत्यारोप सुरु असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी  सकाळी ११ वाजेदरम्यान पोलीस आयुक्त पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना पोलीस परवानगी दिल्याचे पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना सांगितले.

सार्वजनिक कार्यक्रमासाठी शहर पोलीस आयोजकांकडे विविध कागदपत्रांची मागणी करतात. त्यातून आयोजक व पोलिसांमध्ये वाद होत आहेत. शहरातील विविध कार्यक्रमांना पोलीस परवानगी देताना टाळाटाळ केली जात असल्याने पोलीस आयुक्तांबदल आयोजकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समितीने आयोजित केलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमावरुन आयोजक व पोलीस आयुक्तांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.त्याची दखल पालकमंत्री भुजबळांनी घेतली. पोलीस आयुक्त पाण्डेय भुजबळ फार्मवर आले होते. यावेळी पालकमंत्री व पोलीस आयुक्तांमध्ये नववर्ष स्वागत कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत चर्चा झाली.

शहरातील कार्यक्रमांना ऑनलाईन पद्धतीने परवानगी दिली जाणार आहे. सिटीझन पोर्टलवरसुद्धा पोलीस परवानगी दिली जाणार आहे. अद्यापपर्यंत ९० टक्के परवानग्या देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करणार्‍या आयोजकांना चर्चेस बोलवले तरी ते येत नाहीत. चर्चा न करताच परवानगी मागत आहेत. – दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त

 

First Published on: March 31, 2022 8:19 AM
Exit mobile version