नाशिक-कोलकाता विमानसेवा २९ मार्चपासून

नाशिक-कोलकाता विमानसेवा २९ मार्चपासून

नाशिकची हवाई क्षितीजे विस्तारत असून आता स्पाईसजेट कंपनीने नाशिक-कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ मार्चपासून ही सेवा सुरू होणार असून याकरीता कंपनीने आपल्या संकेतस्थळावर बुकिंगही सुरू केले आहे. या सेवेमुळे अवघ्या अडीच तासांत नाशिककर कोलकाता येथे पोहचणार आहेत.

उडाणअंतर्गत स्पाईसजेट ही सेवा सुरू करत आहेत. आठवड्यातून सहा दिवस म्हणजेच सोमवार ते शनिवार अशी ही सेवा दिली जाईल. साधारपणे या प्रवासासाठी ६५०० रुपये तिकिट दर असणार आहे. तर विभागाची आसन क्षमता १८९ असेल. यासंदर्भात स्पाईसजेटने सर्वेक्षण केले असून नाशिक-कोलकाता सेवेला मोठा प्रतिसाद लाभण्याची कंपनीला खात्री आहे. सध्या ओझर विमानतळाहून अलायन्स एअरची नाशिक – हैदराबाद, नाशिक – पुणे, नाशिक – अहमदाबाद सेवा सुरू आहे. तर, ट्रुजेटची नाशिक – अहमदाबाद, स्पाईसजेटची नाशिक – दिल्ली, नाशिक – हैदराबाद, नाशिक – बंगळुरू, तर स्टार एअरची नाशिक बेळगाव ही सेवा २५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी खुशखबर

स्पाईसजेटच्या माध्यमातून सध्या नाशिक-दिल्ली सेवा सुरू आहे. परंतु, ही सेवा आठवड्यातून चारच दिवस दिली जाते. मात्र, या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद बघता आता ही सेवा १ एप्रिलपासून आठवड्यातून
७ दिवस दिली जाणार असल्याचे स्पाईसजेटने कळवले आहे.

अशी असेल वेळ

कोलकात्याहून सकाळी ६ वाजता उडडाण करेल व ओझर येथे ८: वाजता पोहोचेल. तर नाशिकहून सकाळी ९ वाजता निघेल कोलकाता येथे ११ वाजता पोहोचेल.

First Published on: February 20, 2021 4:15 PM
Exit mobile version