४८ तास चालणार ‘नामको’ची मतमोजणी

४८ तास चालणार ‘नामको’ची मतमोजणी

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी मतदान

व्यापारी वर्गात प्रतिष्ठा लाभलेल्या नाशिक मर्चट्स सहकारी (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवार (दि.२६) पासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवारांची मतमोजणी अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे दोन दिवस ही मतमोजणी चालेल असा अंदाज जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद भालेराव यांनी वर्तविला आहे.

८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले

‘नामको’च्या निवडणुकीत २१ जागांसाठी रविवारी अवघे ३६ टक्के मतदान झाले. तर दहा वर्षाच्या तुलनेत यंदा मतदानाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. नविन नाशिकमधील संभाजी स्टेडीयम येथे बुधवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. २१ जागांसाठी प्रमुख तीन पॅनलसह अपक्ष असे एकूण ८२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

मतमोजणीसाठी १०५ टेबलची मांडणी

मतदानानंतर राज्यभरातील मतपेट्या नवीन नाशिक येथील राजे संभाजी स्टेडीयम मध्ये ठेवण्यात आल्या. सुरतची पेटी पहाटे दाखल झाली असून हैद्रबादची मतपेटी आज दुपारी स्टेडीयमवर दाखल झाली. मतमोजणीसाठी १०५ टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर ४ कर्मचारी आणि एक रो ऑफीसर नेमण्यात आले आहे.

 

First Published on: December 25, 2018 10:15 PM
Exit mobile version