मुंबईसाठी ३०, पुणे ४५, तर औरंगाबादचा प्रवास ४० रुपयांनी महागला

मुंबईसाठी ३०, पुणे ४५, तर औरंगाबादचा प्रवास ४० रुपयांनी महागला

नाशिक : एसटी महामंडळाने इंधन दरवाढ तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींचे कारण देत महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी सोमवारपासून भाडेवाढ लागू केली. महामंडळाने तीन वर्षांनंतर १७.१७ टक्के भाडेवाढ लागू केली असून तिकिटात किमान ५ रूपयांची वाढ झाली आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी ३० रुपये, पुण्यासाठी ४५ तर, औरंगाबादसाठी ४० रुपये जास्त मोजावे लागतील. हे सर्वसाधारण बसचे दर आहेत.

मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवाशांकडून सुधारीत दराने तिकिट आकारणी सुरू केली आहे. तसेच, ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रकमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले.

अशी झाली दरवाढ

First Published on: October 26, 2021 8:29 PM
Exit mobile version