शहरातून सात सराईत गुन्हेगार तडीपार

शहरातून सात सराईत गुन्हेगार तडीपार

CP Office

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांनी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणार्‍या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरु केली आहे.

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर व मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील सात सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील १२५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून एक टोळी व ११ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीची चौकशी सुरु आहे. सात गुन्हेगार सातत्याने शरीराविरूद्ध व मालाविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी पूर्ण करून चौकशीअंती त्यांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पारीत केले आहेत. कृष्णा जाधव, हेमंत परदेशी, समीर सैय्यद, मुस्तकिम खान या चौघांना लवकरच ताब्यात घेत तडीपार आदेश बजावला जाणार आहे. या चौघांना हवे असेल त्या जिल्ह्यात पोलीस पथकामार्फत सोडून दिले जाणार आहे.

तडीपार गुन्हेगारांची नावे

राहुल रतन खैरे (२१, पंचवटी), विक्री ऊर्फ टमाट्या शामलाल कुटे (२३, रा.मल्हारखान), फरहान ऊर्फ दहशत कलीम शेख (२०, रा.भद्रकाली), कृष्णा मधुकर जाधव (१९, रा.नाशिक), हेमंत शांतीलाल परदेशी (२३, रा.नाशिक), समीर मुनीर सैय्यद (२२, रा.संत कबीर झोपडपट्टी), मुस्तकिम ऊर्फ मज्जा रहिम खान (२८, रा.वडाळानाका).

First Published on: July 1, 2019 7:49 PM
Exit mobile version