नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सेनेला धोबीपछाड

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सेनेला धोबीपछाड

विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्व आडाखे मोडीत निघाले असताना, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीने आगेकूच करत शिवसेनेच धनुष्य रोखत १५ पैकी ६ जागा पटकावल्या. गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीला यंदा २ जागा अधिक मिळाल्या. भाजपला ५, एमआयएमला १ आणि काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, कळवणमधून नितीन पवार, येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरी पेठमधून नरहरी झिरवाळ आणि निफाडमधून दिलीप बनकर यांचा विजय झाला.

First Published on: October 24, 2019 5:36 PM
Exit mobile version