६८७ अस्वच्छ नागरिकांकडून ६ लाखांचा दंड वसुल

६८७ अस्वच्छ नागरिकांकडून ६ लाखांचा दंड वसुल

कचरा

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा डंका वाजवण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा तयारी सुरु केली आहे. त्या दृष्टीने, गेल्या चार महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या ६८७ जणांवर कारवाई करून तब्बल ६ लाख १८ हजार ६२७ रुपयांचा दंड वसूल केला आहे. नवीन नाशिक विभागात सर्वाधिक २३१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर नाशिकरोड विभागातून सर्वात जास्त २ लाख २८ हजार १६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे..

केंद्र शासनाच्या ’स्वच्छ शहर’ स्पर्धेत नाशिकची घसरलेली क्रमवारी सुधारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत.
या स्पर्धेत नाशिकची कामगिरी सुमार राहिली आहे. या स्पर्धेत चार वेळा नाशिककरांचा भ्रमनिरास झाल्यानंतर आता पाचव्यांदा जानेवारी २०२०मध्ये स्वच्छ शहर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदातरी नाशिकचा समावेश देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये व्हावा, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून शहर स्वच्छतेसाठी नाशिककरांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेताना अस्वच्छता पसरविणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णयदेखील प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे व घाण करणार्‍यांना जागेवरच दंड आकारण्याचा अधिकार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार महापालिकांना दिला आहे. यात अस्वच्छता करणार्‍यांसाठी दंडाची रक्कमही निश्चित केली आहे. त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. १ एप्रिल ते २७ जुलै २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता फैलावणार्‍या ६८७ जणांवर कारवाई केली आहे

अस्वच्छता करणार्‍यांंवर अशी झाली कारवाई-

दंडाचे स्वरुप असे-

सार्वजनिक ठिकाणी कचरा वा घाण टाकणार्यांची माहिती नागरिकांनी महापालिकेच्या या क्रमांकावर द्यावी माहिती-

विभाग संपर्क क्रमांक

घंटागाडी ठेकेदारांना तब्बल साडेतीन कोटींचा दंड

एकीकडे शहरवासियांना स्वच्छतेच्या बाबतीत वळण लावण्यासाठी महापालिका दंडात्मक कारवाई करत असताना दुसरीकडे कचरा संकलनाची मुख्य जबाबदारी ज्या घंटागाडी ठेकेदारांवर आहे, त्यांच्यावरही कटाक्षाने नजर ठेवली जात आहे. अनियमितता, सुस्थितीत नसलेली वाहने, ओल्या कचर्‍याचे वर्गीकरण न करणे यासह अनेक कारणांमुळे गेल्या अडीच वर्षात सहाही विभागांतील घंटागाडी ठेकेदारांकडून महापालिकेने तब्बल तीन कोटी ६२ लाख ४२ हजार ५४५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. यामध्ये पंचवटी व नवीन नाशिक विभागातील ठेकेदाराकडूनच तब्बल २ कोटी ७० लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे..

कचरा

घंटागाड्यांविषयक नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारींचे कायमस्वरूपी निराकरण होण्यासाठी प्रत्येक घंटागाडीच्या दैनंदिन केरकचरा संकलन मार्गाची भौगोलिक परिसीमा अर्थात ’जिओ फेन्सिंग’ निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते. त्यानुसार घंटागाड्यांकरिता दैनंदिन केरकचरा संकलनाचा मार्ग पुन्हा परिभाषित करून जीपीएस कार्यप्रणालीत त्याचा अंतर्भाव करण्यात आला. मार्ग निश्चित केल्यानंतरही घंटागाड्यांची अनियमितता मात्र संपलेली नाही. निर्धारित मार्गावर दैनंदिन केरकरचा संकलन न केल्यामुळे घंटागाडी ठेकेदारांना गेल्या १४ दिवसांतच तब्बल १ लाख ७१ हजार २५० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे..

First Published on: August 1, 2019 11:59 PM
Exit mobile version