पालिकेचे युध्दपातळीवर आपत्कालीन कामे

पालिकेचे युध्दपातळीवर आपत्कालीन कामे

शहरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साठले असून झाडेही पडली आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन केंद्रावर या संदर्भात ३५ तक्रारी प्राप्त झाल्यात. याशिवाय अनेक ठिकाणी तक्रारीविना काम करण्यात येत आहे. शहरात बुधवारी (ता. २५) धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशकातील सहाही विभागीय कार्यालयांतर्गत असणारी सहा व मुख्यालयातील एक आपत्कालीन कक्ष तसेच अग्निशमन केंद्रांवरील दूरध्वनीवर महापालिकेस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात रस्त्यावर साठलेले पाणी काढणे, रामकुंड परिसर स्वच्छ करणे, पाण्यात अडकलेली वाहने बाहेर काढणे, घरातून पाणी काढणे, आग लागणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश सर्व खाते प्रमुख व विभाग प्रमुखांना दिलेे. त्या अनुषंगाने पालिकेचे जेसीबी ट्रॅक्टर, अग्निशमन विभागाची वाहने तसेच कर्मचारी यांच्या माध्यमातून हे कामकाज सुरू आहे.

येथे काढण्यात आले साठलेले पाणी

शहरातील रामकुंड व परिसरात वाहून आलेला साफसफाई करण्यात आली आहे. सातपूर परिसरातील बेंडकुळी नगर, माळी कॉलनी, श्रमिकनगर, सीएट कंपनी परिसर, गाजरे हॉस्पिटल, अहिल्यादेवी होळकर चौक, नवीन नाशिक परिसरातील विविध परिसरात तसेच सातपूर एमआयडीसी,उत्तम नगर, बुद्धविहार परिसर, गणेश चौक, पाटील नगर, पाटील पार्क, तिडके नगर, सुला वाईन चौक, पपया नर्सरी चौक भागात साठलेले पाणी मोकळे करण्यात आले. तसेच साठलेला गाळ उचलुन स्वच्छतेचे कामकाज सुरू करण्यात आले. नदी पत्रालगत महापालिकेच्या वतीने ध्वनिक्षेपकावर सतर्कतेच्या सूचना देण्यात येत होत्या.

 

 

 

First Published on: September 26, 2019 8:45 PM
Exit mobile version