नाशिकच्या निर्बंधांमध्ये बदल नाही, कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार

नाशिकच्या निर्बंधांमध्ये बदल नाही, कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार

नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण सापडले असले तरीही सध्याच्या निर्बंधांमध्ये, व्यवसायाच्या वेळेत कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. नाशिक शहरासह जिल्ह्यात ३० कोरोनाबाधितांच्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड आदींची संयुक्त बैठक झाली. त्यात डेल्टाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांमध्ये बदल करण्याऐवजी ज्या भागात रुग्ण आढळून आले, त्या भागावर लक्ष केंद्रीत करून त्या ठिकाणी निर्बंध कठोर करण्यावर चर्चा झाली.

First Published on: August 7, 2021 1:12 PM
Exit mobile version