मध्यवर्ती बाजारपेठेतील या ठिकाणी आता ‘नो एन्ट्री’

मध्यवर्ती बाजारपेठेतील या ठिकाणी आता ‘नो एन्ट्री’

नाशिक ; दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी बाजारपेठांमध्ये २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सात मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दुचाकी वाहनांना या मार्गांवर प्रवेश दिला जाणार असून, पाच ठिकाणी पार्किंग सुविधासुद्धा करण्यात आली आहे. नागरिकांनी पार्किंग ठिकाणीच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिसूचना काढत वाहतूक मार्गात बदल केले आहेत. बंद करण्यात आलेल्या मार्गांवरील पाच ठिकाणी बॅरीकेडिंग करण्यात आले आहे. वाहतूक सुरुळीत ठेवण्यासाठी सरकारवाडा, भद्रकाली व वाहतूक पोलीस बॅरीकेडिंग करणार आहेत. या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी व चार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांनी रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, बादशाही कॉर्नर, ठाकरे गल्ली कॉर्नर येथे बॅरीकेडिंग केले आहे. या ठिकाणी फक्त पोलीस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी अधिसूचनेचे पालन करावे. उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

पर्यायी मार्ग

पंचवटीतील वाहनचालकांनी मालेगाव स्टॅण्ड ते मखमलाबाद नाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे इतर ठिकाणी जावे. जुन्या नाशकात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांनी शालिमार ते गंजमाळ सिग्नल, दुधबाजार मार्गाचा वापर करावा.

प्रवेश बंदी असलेले मार्ग

या ठिकाणी करा पार्किंग 

First Published on: October 28, 2021 6:55 PM
Exit mobile version