नायलॉन मांजाचा दोर; पक्ष्यांना घोर; ११ जखमी तर ‘इतके’ ठार

नायलॉन मांजाचा दोर; पक्ष्यांना घोर; ११ जखमी तर ‘इतके’ ठार

नाशिक : नायलॉन मांजाला बंदी असतानाही सर्रासपणे विक्री झाल्याने यंदाही निष्पाप पक्ष्यांवर संक्रांत आली. जीवघेण्या मांजामुळे रविवारी (दि.१५) दिवसभरात शहराच्या वेगवेगळ्या भागांतील घटनांत ११ पक्षी जखमी झाले. त्यातील तीन कबुतर आणि एका घारीचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. तरुणाईकडून घातक नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक मुक्या जीवांना गंभीर दुखापत झाली असून, पक्षीमित्रांतर्फे त्यांच्यावर उपचार ,सुरू आहेत.

इंदिरानगरमधील विनयनगरमध्ये मांजामुळे घार जखमी झाली होती. ही बाब कुंतल जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ नायलॉन मांजातून घारीची सुटका केली. त्यामुळे घारीला जीवदान मिळाले. सातपूर आणि नवीन नाशिक परिसरात मांजामुळे जखमी झालेले कबुतर व घार यांना वेळेवर मदत न मिळाल्याने अतिरक्तस्त्राव झाला. त्यातच या चार पक्ष्यांचा मृत्यू झाला.

सकाळी नऊ वाजेपासूनच मांजामुळे पक्षी जखमी झाल्याचे कॉल अग्निशमन विभागासह पोलीस नियंत्रण कक्षात खणाणले. शहरातील इको एको फाउंडेशन स्वयंसेवक वैभव भोगले, अरुण अय्यर, शर्ली रेकी, आदित्य सामेळ, पूजा लड्डा, कृष्णा कुमावत या पक्षीमित्रांनी वेळीच धाव घेत पक्ष्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. जखमी पक्ष्यांना नागरिक व इको एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी त्र्यंबकेश्वररोडवरील वनविभागाच्या कार्यालयाच्या तात्पुरत्या वैद्यकीय उपचार केंद्रात दाखल केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ पक्ष्यांवर उपचार झाले असले तरी रात्री उशिरापर्यंत पक्षीमित्रांना फोन सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नायलॉन मांजाचा वापर जास्त झाल्याचे दिसल्याने जखमी पक्ष्यांची संख्या वाढण्याची भीती पक्षीमित्रांनी वर्तविली आहे.

जखमी पक्ष्यांची संख्या
First Published on: January 16, 2023 12:20 PM
Exit mobile version