पोलीस, आरोग्यसेवकासह एकाचा कोरोनामुळे मृत्यू

पोलीस, आरोग्यसेवकासह एकाचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.२४) प्रशासनास शहरातील २१ पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आठ दिवसांपुर्वी शहरात ४७ बाधित रुग्ण होते. ती आज दुपटीने वाढली असून ११५ वर पोहचली आहे. डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या ५३ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा रिपोर्ट येण्याआधीच मृत्यू झाला आहे. पंचवटीत एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याचा शहरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, मृत कर्मचारी आजारी असताना उपचारासाठी विविध ठिकाणी भेट देत होते. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण ९83 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंदोबस्तावर असणार्‍या पोलीस कर्मचार्यांच्या जीवाला निश्चितच धोका वाढला आहे. आता मोठ्या संख्येने पोलिसांना बाधा होऊ लागली असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे. सोमवारी सकाळी मविप्र रुग्णालयात पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. संबंधित कर्मचारी ग्रामीण गुन्हे शाखेचे असून, ते मालेगावी बंदोबस्तावर होते. अद्याप त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. याव्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पेठरोड परिसरातील 36 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याने आता शहरातील मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. शहरात सोमवारी दिवसभरात आढळून आलेले २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. बाधितांमध्ये ५ व ७ वर्षीय बालकांचा समावेश आहे.

शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण

जेल रोड (१), नाशिक रोड (२), क्रांतीनगर,पंचवटी (१), वडाळा (२), रामनगर,पेठरोड (९), पेठ रोड, पंचवटी (४), शिवाजी वाडी, वडाळा-पाथर्डी रोड (२).

५५ रुग्ण दाखल

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ५५ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय १३, नाशिक महापालिका रुग्णालये २१, मालेगाव महापालिका रुग्णालये ४, नाशिक ग्रामीण रुग्णालयात १७ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

४३२ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात सोमवारपर्यंत १० हजार १४८ संशयित रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ८ हजार ७४८ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह, ९६७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून अद्याप ४३२ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण ९५, नाशिक शहर १६७, मालेगाव शहर १७० रुग्ण आहेत. ९६७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १८७ रुग्णांर उपचार सुरु आहे.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —-9८३
नाशिक शहर —–११५ (मृत ५)
नाशिक ग्रामीण —-13४ (मृत १)
मालेगाव शहर —–69१ (४५)
जिल्ह्याबाहेरील —-४३ (मृत १)

First Published on: May 25, 2020 8:51 PM
Exit mobile version