देवळा तालुक्यातील रामेश्वर धरणात तरुण बुडाला

देवळा तालुक्यातील रामेश्वर धरणात तरुण बुडाला

देवळा तालुक्यातील रामेश्वर धरणावर पोहण्यासाठी गेलेला एक तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले आहे.

केशव नामदेव आहिरे (वय २३, सरस्वती वाडी, देवळा) हा तरुण तीन मित्रांसह धरणावर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना घडली.  या तरुणासोबत असलेल्या इतर दोघांनी केशव बुडाल्याचे लक्षात येताच तातडीने ही माहिती इतरांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत शोथकार्य सुरू केले. यापूर्वीदेखील देवळा तालुक्यातील दहीवडनजीक असलेल्या धबधब्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सरकारी यंत्रणांकडून वारंवार सतर्कतेबाबत सूचना देऊनही उत्साही तरुण ऐकत नसल्याचेच अशा घटनांतून दिसून येते आहे.

First Published on: October 4, 2020 4:32 PM
Exit mobile version