ओझरला ऑनलाईन योगदिन

ओझरला ऑनलाईन योगदिन

येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस कोरोना नियमांचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला.

घरीच योग व कुटुंबासह योग हा यावर्षीचा विशेष संदेश घेऊन शाळेतील 953 विद्यार्थी, 143 पालक, 64 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुगल मीट आणि यू-ट्यूब लाईव्ह मार्फत ऑनलाईन योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. कोरोनाच्या संकटकाळात योग व प्राणायामचे महत्त्व विद्यालयाचे प्राचार्य के. एन. पाटील यांनी विषद केले. यावेळी क्रीडाशिक्षक राजेंद्र शेळके व योग शिक्षक प्रसाद कुलकर्णी यांनी योग प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले. प्रतिभा सोनवणे यांनी योगाचे महत्त्व समजावून दिले. ऑनलाईन प्रक्षेपण व चित्रीकरणाची जबाबदारी आर. पाटील, भूषण पाटील यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनल देशपांडे यांनी केले. डी. आर. पठाडे यांनी आभार मानले.

First Published on: June 22, 2021 11:28 AM
Exit mobile version