विरोधकांनी मेगा गळतीची चिंता करावी : देवेन्द्र फडणवीस

विरोधकांनी मेगा गळतीची चिंता करावी : देवेन्द्र फडणवीस

भाजप मेगा भरतीची चिंता करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या पक्षात होणार्‍या मेगा गळतीची चिंता करावी. आमच्या पक्षात कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो आहे. परंतु, नेत्यांना गाळणी करूनच प्रवेश दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शुक्रवारी (२३ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत सांगितले.

धुळ्यातून जळगावकडे महाजनादेश यात्रा मार्गस्थ होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, बबन चौधरी उपस्थित होते. अजित पवार यांच्या संदर्भात उच न्यायालयाने केलेल्या आदेशात सूचना केल्या आहे. या आदेशाचे पालन केले जाणार आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर व त्यांच्या परिवाराचे मोठे योगदान आहे. अनेक क्रांतिकारकांचे ते गुरू होते. त्यामुळे त्याचा सन्मान राखला पाहिजे. माथे भडकावून कुणीही कायदा व सुव्यवस्था खराब करू नये, असा इशारा त्यांनी दिला. आता वातावरणाच्या बदलाचे मोठे आव्हान उभे आहे. तीन महिन्यात पडतो त्यापेक्षा 700 टक्के पाऊस काही दिवसात पडला. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने पूर स्थिती गंभीर झाली आहे. या संदर्भात समितीकडून सर्व माहिती घेतो आहे.

मोटार उद्योगात निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र शासनाचे लक्ष आहे. आता काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा निघाली असून राष्ट्रवादीची अवस्था सर्वाना माहित असल्याचा टोला त्यांनी लगावला. मेगाभरती म्हणजे एकाच वेळी मोठी भरती असा नसून, नियोजित वेळेत सर्व विभागात भरती करणे आहे.

First Published on: August 23, 2019 6:26 PM
Exit mobile version